Ganga Lahari | गंगालहरी

Ganga Lahari  | गंगालहरी

About Course

“गंगालहरी” 7 Jun-14 Jun 2024
संस्कृत साहित्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविणार्या कवींमध्ये पंडितराज जगन्नाथाचे नाव अग्रगण्य मानले जाते. जगन्नाथाच्या काव्यकृतींमध्ये सर्वाधिक परिचित रचना ‘गंगालहरी’ ही आहे. देवनदी गंगेवर रचलेलं हे स्तोत्र पीयूषलहरी या नावानेही प्रसिद्ध आहे. या स्तोत्रांत बावन्न श्लोक असून, त्यांत गंगेच्या लोकोत्तर अशा विविध गुणांचे वर्णन व स्वतःच्या उद्धाराविषयी कळवळ्याची प्रार्थना आहे.
या स्तोत्रावर अनेक भाषांमध्ये टीका, समश्लोकी अनुवाद केले गेलेले आहेत.
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून, दशमीपर्यंत ‘गंगादशहरा’ हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. कित्येक भाविक या काळांत गंगालहरीस्तोत्राचा नित्यपाठ करतात. आगामी पावन गंगादशहरापर्वणीच्या निमित्ताने जाणून घेवूयात या गंगालहरी स्तोत्रामध्ये दडलेलं शब्दार्थांचे व भक्तिभावाचे सौंदर्य तसंच गंगामैय्याचे माहात्म्य… श्री प्रणव गोखले यांच्या कडून.

Course Content

₹1200.00

Course By

Dnyaanyatra

Scroll to Top