Ganpati Bappa Morya- Children Workshop
About Course
“गणपती बाप्पा मोरया” –‘ओळख गणेशाशी’
– डॉ. गौरी मोघे
महाराष्ट्रात ‘गणेशोत्सवाच्या’ परंपरेचे धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक महत्त्व आहे. पुण्यात तर विशेष, कारण ह्या तीनही पद्धतीने हे गणेशोपासनेचे महत्व वृद्धिंगत होत गेले. देव ते देवळे, आचार-विचार, आरत्या, स्तोत्रे, सामूहिक उपासना आणि एकोपा हे सगळे साध्य होते ते ह्या देवतमुळे, गणपतीमुळे. पेशवेकालीन गणपतींपासून ते मानाच्या गणपतींपर्यंत ही परंपरा म्हणूनच आजही अक्षरशः वाजत गाजत सुरु आहे. पण तरीही मिरवणूकीत मिरवणारा, मानाचा म्हणून पूजला जाणारा, ग्रामदैवत म्हणून कसब्यात, तर पावणारा म्हणून सारसबागेत साजणारा, असा हा गणपती प्रत्येक घरात तर प्राण-प्रतिष्ठित होतोच पण प्रत्येक लहान मुलासाठी त्याचा ‘बाप्पा’ म्हणून लाडका होतो. गणेश या देवतेची, देवळांची, कथांची, आरत्यांची , संगीताची, ही समृद्ध आणि महान् परंपरा- कुठल्याही वैचारिक गल्लती-गैरसमजूती न होता, केवळ दिखाव्यापुरती न राहता पुढच्या पीढीपर्यंत जायला हवी. ती शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांना परिचित असावी आणि नंतर वाढत जावी म्हणूनच आम्ही एक नवीन उपक्रम सादर करत आहोत. ज्यामध्ये लहान मुलांना गप्पा-गोष्टींमधून ‘गणपती’ या देवतेचा शास्त्रशुद्ध परिचय करून दिला जाईल. आपले सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांकडे आगामी पिढीने डोळसपणे पण पाहिले पाहिजे. प्रसाद-फुले-मोदक-दुर्वा, इ. वाहिले पाहिजे पण देवतेचे स्वरूप, इतिहास, आणि मूळ प्रेरणा जाणून घेऊन. म्हणून ह्या उपक्रमाचा ‘श्रीगणेशा’ करत आहोत यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने- “गणपती बाप्पा मोरया”.
- गणपती – देवता व स्वरूप
- पुराणातील कथा
- मराठी व संस्कृत श्लोक, स्तोत्र-रचना शुद्ध उच्चारणासह- नंतरही सरावासाठी काही audio-videos उपलब्ध
- प्रसिद्ध व विशेष गणपतींची माहिती
- भारताबाहेरील प्राचीन गणपतींची माहिती दृक्श्राव्य माध्यमातून
- रंजक व मुलांना आवडेल अशा माध्यमातून ही माहिती दिली जाईल
- दोन दिवस- दोन-ते तीन तास अवधीमध्ये.